अलिबाग, दि.8 : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 952 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 45 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-36, पनवेल (ग्रा)-3, उरण-1, खालापूर-1, अलिबाग-1, माणगाव-1, महाड-2 अशा प्रकारे एकूण 45 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात पनवेल (मनपा)-1 अशा 1 व्यक्तीची मृत व्यक्ती म्हणून नोंद झालेली आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-257, पनवेल ग्रामीण-55, उरण-14, खालापूर-7, कर्जत-11, पेण-10, अलिबाग-5, मुरुड-13, माणगाव-13, तळा-5, रोहा-2, सुधागड-1, म्हसळा-27, महाड-12, पोलादपूर-7 अशी एकूण 439 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-458, पनवेल ग्रामीण 179, उरण-154, खालापूर-5, कर्जत-17, पेण-13, अलिबाग-34, माणगाव-38, तळा-7, रोहा-21, सुधागड-1, श्रीवर्धन-9, म्हसळा-1, महाड-2, पोलादपूर-13 अशी एकूण 952 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-31, पनवेल ग्रामीण-10, उरण-2, कर्जत-4, पेण-2, अलिबाग-20, माणगाव-7, तळा-2, रोहा-2, पोलादपूर-2 असे एकूण 82 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-33, पनवेल ग्रामीण-9, उरण-1, खालापूर-1, कर्जत-3, अलिबाग-3, मुरुड-2, तळा-1, श्रीवर्धन-2, म्हसळा-3, महाड-4, पोलादपूर-1 असे एकूण 63 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आतापर्यंत जिल्ह्यातून 4 हजार 673 नागरिकांचे SWAB कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तपासणी अंती त्यापैकी 3 हजार 184 नागरिकांचे रिपोर्ट ‘-’ ve प्राप्त झाले आहेत तर तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 35 आहे.