पनवेल दि.7: रायगड जिल्ह्यात आज 23 नवीन रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 65 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात 19, पनवेल ग्रामीण मध्ये 3 आणि कर्जत मध्ये एक रुग्ण सापडला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात आज दोघांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 1409 झाली असून जिल्ह्यात 62 जणांचा मृत्यू झाला आहे.
रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे 23 नवीन रुग्ण सापडले आहेत. पनवेल तालुक्यात 22 नवीन रुग्ण सापडले असून त्यातील पनवेल महापालिका क्षेत्रात 19 नवीन रुग्ण आहेत. आज नवीन पनवेल सेक्टर 10 शिव सोनेरी सोसायटीतील 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याला पूर्वी पासून मधुमेहाचा आजार होता. कर्जत मध्ये ही आज एक नवीन रुग्ण सापडला आहे.
जिल्ह्यात रविवार पर्यंत 4552 टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी 1409 पॉझिटिव्ह आल्या आहेत 56 टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर 870 जणांनी मात केली असून 477 रुग्णावर उपचार सुरू आहेत जिल्ह्यात 62 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.