अलिबाग,दि. 03: स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 51 हजार 541 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 108 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-59, पनवेल ग्रामीण-9, उरण-3, खालापूर-2, कर्जत-3, पेण-9, अलिबाग-10, माणगाव-2, रोहा-4, सुधागड-1, श्रीवर्धन-3, म्हसळा-1, महाड-1, पोलादपूर-1 असे एकूण 108 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात 5 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-2, खालापूर-1, रोहा-2) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-632, पनवेल ग्रामीण-300, उरण-33, खालापूर-40, कर्जत-12, पेण-64, अलिबाग-53, मुरुड-3, माणगाव-19, रोहा-28, सुधागड-5, श्रीवर्धन-8, म्हसळा-3, महाड-16, पोलादपूर-5 अशी एकूण 1 हजार 221 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-22 हजार 535, पनवेल ग्रामीण-6 हजार 560, उरण-1 हजार 933, खालापूर-2 हजार 516, कर्जत- 1 हजार 654, पेण-3 हजार 719, अलिबाग-4 हजार 704, मुरुड-413, माणगाव- 1 हजार 871, तळा-162, रोहा-2 हजार 309, सुधागड-386, श्रीवर्धन-382, म्हसळा-308, महाड- 1 हजार 684, पोलादपूर-405 अशी एकूण 51 हजार 541 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-97, पनवेल ग्रामीण-15, उरण-6, खालापूर-14, कर्जत-2, पेण-7, अलिबाग-9, माणगाव-4, रोहा-6 असे एकूण 160 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-556, पनवेल ग्रामीण-131, उरण-110, खालापूर-118, कर्जत-97, पेण-102, अलिबाग-138, मुरुड-24, माणगाव-37, तळा-9, रोहा-88, सुधागाड-26, श्रीवर्धन-21, म्हसळा-13, महाड-74, पोलादपूर-19 असे एकूण 1 हजार 563 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आतापर्यंत जिल्ह्यातून 2 लाख 06 हजार 228 नागरिकांचे SWAB तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 130 आहे.