पनवेल दि. 9: पनवेल तालुक्यात आज ७ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून महापालिका हद्दीत ५ तर ग्रामीण भागात २ रूग्णांची नोंद झाली आहे. दुःखद बाब म्हणजे कामोठे येथील २ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ८ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये खारघरमधील २, कामोठ्यातील २ तर कळंबोली, उसर्ली खुर्द, विचुंबे येथील प्रत्येकी १ रूग्णाचा समावेश आहे.
खारघर : २
खारघर सेक्टर-१२, सुर्योदय सोसायटी येथील ४३ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही महिला होमनर्स म्हणून वांद्रे येथील एका व्यक्तीच्या घरी काम करीत होती. सदर व्यक्तीच्या कुटुंबातील एक सदस्य याअगोदर कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेला होता. त्या व्यक्तीपासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
खारघर, सेक्टर-११, फ्रेंड सोसायटी येथील ३६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती चेंबुर पोलिस स्टेशन, मुंबई येथे PSI या पदावर कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
कामोठे : २
कामोठे, सेक्टर-९, क्षिरसागर सोसायटी येथील ४५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यकती मुंबई जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, शाखा मानखुर्द येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
कामोठे, सेक्टर-१८, तिरूपती एनक्लेव्ह येथील ४४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती पोलिस हेडकॉटर्स, मरोड, अंधेरी येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
कळंबोली : १
कळंबोली, कुबेर पॅलेस, सेक्टर-१०ई येथील ३७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती चेंबुर पोलिस स्टेशन येथे PSI पदावर कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
ऊसरली खुर्द : १
निळकंठ विश्व, फेज – २, को. ऑ. हौ. सोसा., ता.पनवेल, येथील ३६ वर्षीय व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती के. ई. एम. हॉस्पिटल, मुंबई येथे स्टाफ नर्स या पदावर कार्यरत आहे. सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
विचुंबे : १
ज्ञानेश्वर माऊली हौ. सोसा., ता. पनवेल, येथील ६० वर्षीय व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे. तसेच सदर व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे.
कामोठे येथील २ रूग्णांचा मृत्यू
कामोठे सेक्टर-३४, मानसरोवर कॉम्प्लेक्स येथील ३९ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली होती. ही महिला दिनांक ४/०५/२०२० रोजी गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल झाली होती. सदर महिलेचे दिनांक ८/०५/२०२० रोजी रात्री दुख:द निधन झाले आहे.
कामोठे सेक्टर-११ आशियाना कॉम्प्लेक्स येथील ५७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली होती. ही व्यक्ती कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त होती. आजरोजी त्यांचे दुख:द निधन झाले आहे.