पनवेल दि.10: पनवेल महापालिका हद्दीत आज १३ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून २० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये खारघरमधील ६, कामोठ्यातील ५ तर कळंबोली, पनवेल येथील प्रत्येकी १ रूग्णाचा समावेश आहे.
आजचे नविन १३ रूग्ण
कामोठे: ५
कामोठे, सेक्टर-५, मारुतीधाम सोसायटी येथील ५६ वर्षीय व २३ वर्षीय असे २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत.
सदर दोन्ही व्यक्ती मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा मानखुर्द येथे कार्यरत आहेत. कामाच्या ठिकाणीच दोघांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
कामोठे, सेक्टर-२१, गौरीशंकर सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ५१ वर्षीय व २४ वर्षीय अशा २ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत असून याआधीच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या महिलांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
कामोठे, सेक्टर-३६, सुरज कॉम्प्लेक्स येथील ४६ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिला K.E.M. हॉस्पीटल, मुंबई येथे स्टाफनर्स म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
खारघर: ६
खारघर सेक्टर-२१, तपोवन सोसायटी येथील ४९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती APMC फुट मार्केट, वाशी येथे क्लर्क म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
खारघर, सेक्टर-३४, साई मन्नत बिल्डिंग, डी-विंग येथील एकाच कुटुंबातील ५ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख SEBI, BKC, मुंबई येथे कार्यरत असून याआधीच ते कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत.
त्यांच्या पासूनच या पाच जणांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
कळंबोली: १
कळंबोली, सेक्टर-४, गुरूव्हीला कॉम्प्लेक्स येथील ४१ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिला नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पीटलमध्ये स्टाफनर्स म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
पनवेल: १
पनवेल, जोशी आळी, सहयोग नगर येथील ४९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती दादर येथील अदी फार्मासी येथे फार्मासीस्ट म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
समाधानाची बाब म्हणजे आज रोजी पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.