पनवेल दि.१०: रायगड जिल्ह्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. उरण तालुक्यात करंजा गावातील चार कुटुंबातील २१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासर्वांना कामोठे एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले आहे.
एक वृद्ध महिला आणि तिच्या पतीच्या संशयित मृत्यूनंतर यांच्या ४३ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर संपर्कात आलेल्या २१ नागरिकांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात १२ महिला, ९ पुरुषांमध्ये ६ बालकांचा समावेश आहे.
मात्र येथील करंजा गावात एकाच दिवशी २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शासनाचे धाबे दणाणले आहेत. तर या परिस्थितीमुळे उरण तालुका रेड झोनकडे जाताना दिसत आहे. यामुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली असून, इतर 35 जणांच्या वैद्यकीय अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!