Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps

पनवेल, दि.18 (संजय कदम) कोरोना प्रादुर्भाव संदर्भात समाजात सोशल मिडीयाच्या माध्यमातून अफवा पसरविणारे तसेच बनावट मास्क आणि सॅनिटायझर विकणारी व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून आल्या असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पो.नि.शत्रुघ्न माळी यांनी दिली.
सध्या सर्व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु काहीजण खोट्या अफवा, बातम्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजात पसरवित आहेत. त्यातून चुकीचा संदेश समाजात जात आहे. ही गोष्ट अत्यंत चुकीची व धोकादायक असून लोकांनी जागृत राहून शहानिशा करूनच माहिती घ्यावी किंवा अशा काही गोष्टी आढळल्यास तात्काळ त्यांनी नजिकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. त्याचबरोबर लोकांच्या गैरसोयीचा फायदा घेवून काही जण बनावट मास्क व सॅनिटायझर सार्वजनिक ठिकाणी विक्री करीत आहेत. अशा व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी अशा गोष्टींना फसू नये असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पो.नि.शत्रुघ्न माळी यांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133