मुंबई, दि. 20 : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरातील सर्व खासगी दुकाने, आस्थापना दि. 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश राज्यशासनाने दिले असले तरी त्यातून सर्व बँका तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित वित्तीय संस्था यांना यातून वगळण्यात आले आहे. राज्यशासनाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे की, रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित स्वतंत्ररित्या कार्य करणारे प्रायमरी डिलर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित बाजारपेठेत कार्य करणारे वित्तीय बाजारातील सहभागीदार यांना 31 मार्च पर्यंतच्या खासगी आस्थापना बंदीतून वगळण्यात आले असून या वित्तीय संस्थांचे कामकाज सुरु असणार आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!