रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
मुंबई दि.३: सिडको प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक संस्था चालवीत असलेल्या शाळांना भुखंड मिळण्यासाठी दोन वर्षांपुर्वी सिडको प्रशासना कडून प्रकल्पग्रस्तांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. प्रकल्पग्रस्तांच्या बऱ्याच संस्थांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही हि निविदा सिडको कडून नंतर रद्द करण्यात आली होती. त्यानंतर त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत हे सिडकोकडे पाठपुरावा करत आहेत परंतु सिडको व्यवस्थापन पाहिजे तितके लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात भेट घेवून निवेदन दिले व या प्रश्नाकडे लक्ष घालण्याची विनंती केली.