पनवेल दि.१३: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य जयंती उत्सव सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण तर्फे गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी उलवे नोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
या उत्सवात सकाळी ८. ३० वाजता गव्हाण येथून मिरवणुकीला सुरुवात होणार असून सकाळी ९.३० वाजता उलवे नोड मधील खारकोपर रेल्वेस्थानकाजवळील रामशेठ ठाकूर मैदान येथे हा उत्सव सोहळा होणार आहे.
या उत्सव सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांची उपस्थिती असणार आहे.
जयंती सोहळ्यानिमित्त त्याच दिवशी रामशेठ ठाकूर मैदानावर सायंकाळी ०७ वाजता ‘द फोक आख्यान’ या कार्यक्रमातील सुप्रसिद्ध शाहीर चंद्रकांत माने आणि शाहिरा ऋतुजा माने यांचा ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे. या उत्सवात शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण समितीचे अध्यक्ष वसंत पाटील, उपाध्यक्ष अशोक कडू, जयवंत देशमुख, खजिनदार गजानन घरत, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समिती तसेच गव्हाण, कोपर, शेलघर, शिवाजीनगर, बेलपाडा, न्हावा, न्हावाखाडी, उलवे, वहाळ, मोरावे, बामणडोंगरी, जावळे व उलवेनोड ग्रामस्थांनी केले आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!