पनवेल दि.१६: भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १९ च्या वतीने गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शोभायात्रा निमित्त पनवेल महानरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हि स्पर्धा १५ वर्षांखालील मुलामुलींसाठी असून स्पर्धेला शहरातील गावदेवी मंदिरापासून सकाळी ७. ३० वाजता सुरुवात होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १७ फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करता येणार असून अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी चिन्मय समेळ ८७६७१४९२०३ किंवा देवांशू प्रभाळे ८४३३५१३५४० यांची संपर्क साधावा आणि या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन स्पर्धा प्रमुख प्रशांत शेट्ये यांनी केले आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!