पनवेल दि.१७: येथील एच.एस. सद्गुरू श्री साई नारायण बाबा श्री साई मंदिर व श्री साईनारायण बाबा आश्रम येथे शिर्डी साईबाबा यांच्या पवित्र पादुकांचे दर्शन सोहळा बुधवार दिनांक १८ ते शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारी दरम्यान भक्तिभावात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामुळे पनवेल परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता श्री साईबाबांच्या पादुकांचे विधीवत स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना पादुकांचे दर्शन घेता येणार आहे. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून या शोभायात्रेत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत अखंड दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. याच दिवशी भजन, तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सकाळी १० वाजेपर्यंत पादुकांचे दर्शन ठेवण्यात आले आहे. त्यानंतर श्री साईबाबांच्या पादुका शिर्डी मंदिरकडे प्रस्थान करणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिर व समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. पनवेल व परिसरातील सर्व साईभक्तांनी या पवित्र दर्शन सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!