पनवेल दि.१८ (संजय कदम) : पनवेल जवळील जुना मुंबई पुणे हायवेवर पोयंजे आणि तुपगाव येथील गावाच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचुन १९ लाख ३८ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीत जुना मुंबई पुणे हायवेवर पोयंजे गावाच्या हद्दीत दारुबंदी गुन्ह्याकामी सापळा रचुन एका चारचाकी वाहनामध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या उच्च प्रतीच्या बनावट विदेशी मद्याच्या १२ बाटल्या, ०२ मोबाईल व एक चारचाकी वाहन असा एकूण ५,६०,३९०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी आरोपीकडे सदर अधिक तपास केला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार खालापूर येथील तुपगाव येथील एका शेतातील घरामध्ये जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी वेगवेगळ्या उच्च प्रतीच्या बनावट विदेशी मद्याच्या ५० बाटल्या विदेशी मद्याच्या १७ बाटल्या देशी मद्याच्या ०४ बाटल्या, ०२ मोबाईल, रिकाम्या चाटल्या, बनावट बुचे, बनावट कागदी लेवले व इतर साहित्य असा एकूण ५ लाख .७८ हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर दोनही ठिकाणी मिजून एकूण १९ लाख ३८ हजार ८३० इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे बिन्नु कल्लूर, विनेश्वर एथ, एस, बिजू उरवा या इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. सदर कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अनिल बिराजदार, राज्य उत्पादन शुल्क कर्ज विभाग निरीक्षक पी. एस. रासकर, निरीक्षक अजित बहरे, सुरेश झगडे, व्वाली भरणे, एम. पी. आगळे, सहाय्यक दुष्यनिरीक्षक निनाव पालवे, जवान ऋषिकेश भोगे, लक्ष्मण हाके, रोहित पाटील, अंकुश जज्जर, धनश्री माळी यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्हयाचा पूढील तपास राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रविकिरण कोले यांच्या मार्गदर्शना खाली दुष्यनिरीक्षक अजित बहरे करीत आहेत.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!