महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर सोमवारी अर्ज दाखल करणार
पनवेल दि.२७: आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी युवा ताकद एकवटली असून त्या अनुषंगाने युवा निर्धार विजयी मेळावा शनिवारी (दि. २६) मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विजयाचा शंखनाद करण्यात आला.
पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथे झालेल्या या मेळाव्याला हजारोच्या संख्येने युवक आणि युवती उपस्थित होते.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील,गोव्याचे आमदार दयानंद सोपटे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रदेश उपाध्यक्ष सुनील राणा, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, विधानसभा प्रमुख व जिल्हा चिटणीस सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर कविता चौतमोल, माजी नगरसेवक हरेश केणी, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह युवा मोर्चा पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी युवा मेळाव्याला संबोधित करताना, पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी मोठी युवाशक्ती उभी आहे. या युवाशक्तीने उत्साह कायम ठेवत मतदानाच्या तारखेपर्यंत काम करत राहिले पाहिजे आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात जे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी उभे केले आहे, ते आपण मतदारांपर्यंत पोहोचवले पाहिजे असे, मार्गदर्शक सल्ला देत या आयोजनाच्या मेळाव्याबद्दल युवा मोर्चाचे कौतुक केले.
समाजात विविध क्षेत्रात वावरणारी आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने सहभाग घेणारी युवाशक्ती आहे आणि ही युवाशक्ती एकवटून एखादी निवडणूक जेव्हा हातात घेते तेव्हा त्या निवडणुकीत विजय हा निश्चित असतो. पनवेल विधानसभा क्षेत्रात ही निवडणूक युवकांनी हातात घेतली आहे आणि त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर हे चौथ्यांदा पनवेल विधानसभा मतदारसंघातून निवडून येतीलच यात शंकाच नाही परंतु आपण त्यांना किती मताधिक्याने निवडून आणतोय याची आता उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे, असे मत विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी युवकांच्या मेळाव्या दरम्यान केले. तसेच मोठ्या मताधिक्याने जर जिंकायचा असेल तर युवकांनी आपल्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ज्या काही योजना जनसामान्यांसाठी अंमलात त्या योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या विधानसभा क्षेत्रात केलेली विकास कामे आपण लोकांपर्यंत पोहोचवा आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या विकास कामावर आपण पनवेल विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय होऊ असेही आमदार विक्रांत पाटील पुढे म्हणाले.
पनवेल विधानसभा मतदारसंघात गेली १५ वर्षे आपले आमदार प्रशांत ठाकूर विजयी होत आहेत ते नी या मतदारसंघात नागरिकांसाठी विविध विकास कामांच्या माध्यमातून मतदारांची सेवा केली आहे आणि त्या माध्यमातून मतदार संघात विकासाचा झंझावात पाहायला मिळतोय, असे मत गोव्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी या मेळाव्या दरम्यान केले.
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने पनवेल विधानसभा मतदार संघाची मला उमेदवारी घोषित केली त्याबद्दल सर्व पक्षाचे नेतृत्वाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. पक्षाच्या नेतृत्वाने उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मला खात्री आहे कि, सर्व कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबतीने या मतदार संघामध्ये आश्वासक निर्णायक असा विजय मिळवू. देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेला विकास महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची होणारी प्रगती अखंडपणे चालू रहावी यासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून विजयी होण्यासाठी सुज्ञ मतदार जनता, सर्व कार्यकर्ते सहकारी साथ देणार आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील प्रश्न हाताळण्यासाठी आणि पनवेलचा विकास करण्यासाठी मला जनतेने ताकद दिली. पनवेल आणि उरणमध्ये अनेक महत्वकांक्षी आणि येथील माणसाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकल्प साकारले आणि आणखी साकारणार आहेत. आणि हे सर्व केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुतीच्या सरकारमुळे शक्य झाले. पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये सर्वाना अभिमान वाटेल असा विजय संपादित करून यापुढील काळातही विकासाचा ओघ आणखी वाढवला जाईल.
– आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल विधानसभा मतदार संघ
महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर सोमवारी अर्ज दाखल करणार
१८८ पनवेल विधानसभा मतदार संघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करत विजयाचा शंखनाद करणार आहेत.
तीनवेळा बहुमतांनी विजयी मिळवत विरोधकांना धोबीपछाड देणारे आमदार प्रशांत ठाकूर मताधिक्य मिळवून विजयाचा चौकार मारण्यासाठी ज्येष्ठ, युवा, महिला, कार्यकर्ते व मतदारराजाच्या आशिर्वादाने सज्ज झाले आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजता पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आणि हितचिंतक जमणार असून त्यानंतर महायुतीतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देणारे आणि जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करणारे लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. या मतदार संघाचे सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून संपृर्ण जबाबदारीने आमदार प्रशांत ठाकूर कार्यरत आहेत. प्रगती पासून दूर आणि भकास झालेल्या पनवेलला विकासाचा चेहरा देण्याचे काम त्यांनी केले, खऱ्या अर्थाने त्यांनी विधायक कामाने पनवेलला विकासकामांची ओळख करून दिली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दूरदृष्टीतून पनवेल विधानसभा क्षेत्रात विकासाचे महापर्व आले. सर्व धर्म समभाव आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम त्यांच्याकडून कायम पहायला मिळते. आपल्या कार्यकौशल्यातून पनवेलचा विकास घडविणारे, वक्तृत्व, दातृत्त्व आणि नेतृत्त्व गुणसंपन्न नेता व समाजप्रिय व्यक्तीमत्व म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांचा नेहमीच नागरिकांना अभिमान राहिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना जनतेचा कौल मिळणार असून सोमवारी ते तमाम जनतेच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.