पनवेल दि.7: थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या जन्म दिनी आणि आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या कार्यापासून स्फूर्ति घेऊन ती वर्षभर म्हणजे 365 दिवस जतन करा असे, आवाहन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले. कोरोना विषाणू संसर्गच्या दृष्टिकोनातून सामजिक अंतर नियमांचे पालन करून कष्टकऱ्यांचे नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची ३२ वी पुण्यतिथी झूम ॲपचा वापर करून ऑनलाईन पध्दतीने एकाच वेळी साजरी करण्यात आली. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे निवासस्थानी स्व. जनार्दन भगत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, वर्षाताई ठाकूर, अर्चना ठाकूर, अमोघ ठाकूर, भाजपचे प्रवक्ते वाय.टी.देशमुख उपस्थित होते तर ऑनलाईन शेलघरहून अध्यक्ष अरुणशेठ भगत, संजय भगत, सीकेटी नवीन पनवेलहून डॉ.एस.टी. गडदे, इंदुमती घरत, संतोष चव्हाण , उज्वला कोटीयन , खांदा कॉलनी डॉ. व्ही.डी. बराटे, आर.टी पी.एस. खारघर राज अलोनी, अनीता मिश्रा, आर.टी.सी.सी.एस. खारघर एस.डी. शहा.के.के.म्हात्रे , बिसिटी लॉं कॉलेज खांदा कॉलनी डॉ. शितला गावंड, द्रोणगिरी अनुराधा काठे आणि नम्रता न्यूटन या गव्हाण येथून उपस्थित होत्या. जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. फक्त राजकारण नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. आयुष्यापेक्षा ध्येय्य मोठे असले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी समाजामध्ये रूजवली. त्यांच्या नावाने व आशिर्वादाने सुरू झालेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने दरवर्षी पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो. पण यंदा कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेऊन संस्थेच्या प्रत्येक शाखेत साधेपणाने व फक्त चार जणांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले, तसेच भगत साहेबांच्या मुळगावी शेलघर येथील निवासस्थानीही सामाजिक अंतर नियमांचे पालन करून फक्त कौटुंबिक आदरांजली वाहण्यात आली.