“१० वी, १२ वी नंतरच्या करिअरच्या संधी आणि व्यक्तिमत्व विकास”
पनवेल दि.०१: आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून माजी आय. ए. एस. अधिकारी आणि चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांचे ‘मार्गदर्शन सत्र व विद्यार्थी संवाद’ कार्यक्रम शनिवार दिनांक ०३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आला आहे.
अविनाश धर्माधिकारी हे भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या करिअर विषयक अनेक पुस्तके लिहिली आहेत. आयुष्य घडविण्याच्या दृष्टिकोनातून इयत्ता १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांना “१० वी, १२ वी नंतरच्या करिअरच्या संधी आणि व्यक्तिमत्व विकास” या विषयावर अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन आणि संवाद लाभणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा कार्यक्रम खांदा कॉलनी मधील चांगू काना ठाकूर उच्च महाविद्यालयात होणार आहे, या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!