“ऑल द बेस्ट” आणि “आज्जी बाई जोरात” प्रवेश विनामूल्य
पनवेल दि.३१: भारतीय जनता पार्टी – सांस्कृतिक प्रकोष्ठ, उत्तर रायगड आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल यांच्या वतीने, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर ह्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित दोन दिवसीय नाट्य महोत्सव आयोजित केला असून मराठी रंगभूमीवरील अजरामर विनोदी नाटक “ऑल द बेस्ट”
आणि शालेय मुलांकरीता विशेष म्हणजे सध्याचे धमाल विनोदी बहुचर्चित नाटक “आज्जी बाई जोरात” ह्यांचे विशेष सादरीकरण होणार असून पनवेलकर रसिक प्रेक्षकांनी आणि छोट्या दोस्तांनी जरूर लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तसेच या नाट्यप्रयोगाचे कोणतेही शुल्क नसून प्रवेश विनामूल्य आहे.
विनामूल्य प्रवेशिकांकरिता संपर्क:
अभिषेक पटवर्धन 9029580343
वैभव बुवा 9029410699