पनवेल,दि. 30 : पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या धोकादायक इमारतींवर निष्कांसन कारवाई करण्याचे आदेश आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवरती आज उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी विभागप्रमुख सदाशिव कवठे यांच्या सोबत चारही प्रभागातील धोकादायक इमारतींची पहाणी केली.
पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती, घरे कोसळून जिवित व वित्त हानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील एकुण 79 धोकादायक इमारती पैकी 47 इमारतींवर निष्कासन कारवाई करण्यात आली आहे. तसेच राहिलेल्या धोकादायक इमारतीमधील वीज व पाणी पुरवठा बंद करण्याबाबत कारवाई सुरू आहे.
दरम्यान प्रभाग समिती ड पनवेल अंतर्गत बाळसराफ चाळ, सिटी सर्व्हे नं. २८९, पोदी नं.२, नविन पनवेल धोकादायक घोषित करण्यात आली होती, त्याअनुषंगाने या धोकादायक चाळीस रिक्त करून निष्कासित करण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६८ पोटकलम (५) मधील तरतुदीनुसार पोलीस प्रशासनाच्या मदतीने चाळ रिक्त करुन आज पनवेल महानगरपालिकेमार्फत या चाळीवर प्रभाग अधिकारी रोशन माळी यांनी निष्कांसन कारवाई करण्यात आली.
तसेच नुकतीच प्रभाग समिती ड पनवेलमधील ठाणा नाक्याजवळील धोकादायक बंगल्यावर निष्कासन कारवाई करण्यात आली आहेत. ठाणा नाका रोडवरील पनवेल महानगरपालिकेचे धोकादायक झालेल्या स्टाफ क्वार्टरवर तोडक कारवाई करण्यात आली. या बरोबर टपाल नाक्यावरील’ बुऱ्हाणी मंजिल’ या तीन मजली धोकादायक इमारतीवर निष्कासन कारवाई सुरू आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!