पनवेल दि.३०: कोरोनाचे निमित्त करत हिंदू धर्मातील सणांचे महत्व कमी करण्याचे काम राज्यातील महविकास आघाडी ठाकरे सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे मंदिरे उघडे करण्यासाठी व झोपी गेलेल्या ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी आज पनवेलमध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आरती करून देवाला साकडे घालण्यात आले.


राज्यातील मंदिरे बऱ्याच काळापासून बंद आहेत. ही मंदिरे उघडावीत या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली असून आज राज्यभरात ठिकठिकाणी शंखनाद आंदोलन करत मंदिरे उघडण्याची मागणी केली आहे. लॉकडाऊन शिथील करण्याच्या प्रक्रियेत राज्यभरात दारुच्या दुकानांना अधिकृत परवानग्या देण्यात आल्या. हॉटेल, बार, सुरु करण्यात आले आहेत मात्र मंदिर, धार्मिक स्थळांचे टाळे बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहरातील विरुपाक्ष मंदिरात शंखनाद आंदोलन करून भक्तीचे दार उघड अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, गुरुनाथ लोंढे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वर्षा नाईक, नगरसेविका रुचिता लोंढे, माजी नगरसेविका निता माळी, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, संजय जैन, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, रवी नाईक, सुहासिनी केकाणे, सपना पाटील, निता मंजुळे, अक्षया चितले, अंजली इनामदार, श्रुती मराठे, चंद्रकांत मंजुळे, महेंद्र गोडबोले, केदार भगत, गौरव कांडपिळे, आकाश भाटी,
राजन पेठे, देवांशु प्रभाले, कादीर शेख, कर्वे गुरुजी, समिर ओझेयांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले कि, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्ण संख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीत जनजीवन जवळपास पूर्ववत सुरू झाले आहे. ठाकरे सरकारने मांस, मदिरा सर्वकाही सुरू केले परंतु संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ‘हरी’ ला मात्र बंदिस्त करून ठेवले आहे. लोकांच्या भावनेचा विचार न करता हम करो सो कायद्याने राज्यातील सरकार कारभार करीत असून सर्वे धार्मिक स्थळे व मंदिरे भाविकांसाठी खुली झालीच पाहिजे अशी जोरदार मागणी यावेळी त्यांनी केली.


‘भाविक भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल’ असा ठाकरे सरकारचा कारभार सुरू आहे. केंद्र सरकारने ४ जून २०२० रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थानेसुद्धा सुरू केलेली आहेत. राज्यातही सामाजिक अंतर राखून आवश्यक नियम अटी शर्तीसह देवस्थाने धार्मिक स्थळे सुरु करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक भक्तांकडून होत आहे. मात्र पुनश्च ‘हरिओम’ म्हणून हरीला बंदिस्त करून ठाकरे सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले आहे. त्यांना जागे करण्यासाठी जागोजागी आंदोलने होत असून मंदिरे दर्शनासाठी खुली करा, अशी मागणी सातत्याने होत आहे. यावेळी ‘मंदिर बंद उघडले बार उद्धवा धुंद तुझे सरकार’, ‘मंदिर बंद गरिबांचे हाल ठाकरे सरकार मालामाल’, ‘भक्तो को जेल मंदिरोपर ताला उद्धव सरकार मे शराब का बोलबाला’, अशा जोरदार घोषणा देऊन महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!