पनवेल,दि.31 : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना अमरजीत यादव या फेरीवाल्याने तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला, या हल्ल्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

दिनांक 30 ऑगस्टला ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचा फेरीवाला अमरजीत यादव याने पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला यामध्ये दोघांनाही गंभीर दुखापत झाली. या गंभीर कृत्याचा निषेध करण्यासाठी तसेच या घटनेतील गुन्हेगारांवर तात्काळ खटला चालवून ,गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी ,यासाठी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटना मुंबईचे अध्यक्ष गणेश देशमुख यांना निवेदन दिले.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावत असताना अधिकाऱ्यांवर हल्ले करतात,तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्या विरोधात संघटित निषेध करण्यासाठी आज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केले.
याप्रसंगी उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव आणि मनपा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अनिल जाधव, शैलेश गायकवाड, सुनिल मानकामे आणि मोठ्या संख्येने महिला कर्मचारी ही उपस्थित होत्या.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!