पनवेल दि.16: जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व गरीब, वंचित, दलित, आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी देवदूत प्रमाणे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी आहे. दरवर्षी पक्षाचे सर्व कार्यकर्ते सेवा सप्ताहाच्या दरम्यान विविध प्रकारचे सेवाकार्य करतात. त्या अनुषंगाने भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग १७, १९ आणि २० मध्ये स्वच्छता मोहीम, जनजागृती पथनाट्य तसेच वृक्षारोपण कार्यक्रम आज संपन्न झाले.

सामाजिक अंतराचे नियम पालन पाळून पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर व भाजपचे शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष संदिप पाटील, नगरसेवक प्रकाश बिनेदार, नगरसेवक मनोज भुजबळ, माजी उपमहापौर व नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेवक तेजस कांडपिळे, नगरसेविका रूचिता लोंढे, नगरसेविका सुशिला घरत, माजी नगरसेवक जगदिश गायकर, जगदिश घरत, रघुनाथ बहिरा, प्रभाग अध्यक्ष पवन सोनी, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, संजय जैन, चिटणीस सुनिल खळदे आदी उपस्थित होते. 

सेवा सप्ताहानिमित्त प्रभाग १७ मध्ये स्वच्छता मोहीम तसेच प्लॅस्टिक मुक्ती जनजागृती पथनाट्य, प्रभाग १९ मध्ये मार्केट यार्ड परिसरात स्वच्छता मोहीम, छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्लॅस्टिक मुक्ती जनजागृती पथनाट्य, प्रभाग २० मध्ये स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण करण्यात आले. 

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!