नवी मुंबई, दि.27: नवी मुंबई येथील तळोजा पोलीस ठाण्यात विविध गुन्हयात जप्त असलेल्या वाहनांचा लिलाव दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी तळोजा पोलीस ठाणे आवारात करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रविण भगत यांनी दिली.
तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्हयात प्राप्त झालेली 05 दुचाकी आणि 01 चारचाकी वाहने अशी एकूण 06 बेवारस वाहने तळोजा पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र करुन ठेवण्यात आली आहेत. मा. सत्र न्यायलयाच्या परवानगीने दि.29 नोव्हेंबर रोजी या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. जाहिर लिलावतील वाहने घेण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी या वाहनांबाबत अधिक माहितीसाठी तळोजा पोलीस ठाण्याचे दूरध्वनी क्रमांक 022-27412333/9082125141/9870301090 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच या लिलावात जास्तीत जास्त स्क्रॅप खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी तसेच नागरिकांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन तळोजा पोलीस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
नवी मुंबई येथील कळंबोली पोलीस ठाण्यात विविध गुन्हयात जप्त असलेल्या वाहनांचा लिलाव दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी तळोजा पोलीस ठाणे आवारात करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक उन्मेश थिटे यांनी दिली.
कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्हयात प्राप्त झालेली 03 दुचाकी, 01 तिनचाकी रिक्षा, 01 चारचाकी आणि 01 ट्रक अशी एकूण 06 बेवारस वाहने कळंबोली पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र करुन ठेवण्यात आली आहेत. मा. सत्र न्यायलयाच्या परवानगीने दि.30 नोव्हेंबर रोजी या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. जाहिर लिलावतील वाहने घेण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी या वाहनांबाबत अधिक माहितीसाठी कळंबोली पोलीस ठाण्याचे दूरध्वनी क्रमांक 022-27423000/9082147899 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच या लिलावात जास्तीत जास्त स्क्रॅप खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी तसेच नागरिकांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन कळंबोली पोलीस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उन्मेश थिटे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.