अलिबाग दि.८: रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असणाऱ्या घोणसे घाटात ठाणे ते श्रीवर्धन अशा प्रवास करणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे.
ही बस आज सकाळी आठच्या सुमारास साठ फूट खोल दरीत कोसळली.
या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत.
जखमींवर म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काही अतिगंभीर असणाऱ्या जखमींना माणगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे म्हसळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी सांगितले.
अपघातग्रस्तांचा मदतीसाठी घटनास्थळी प्रशासनाने तातडीने धाव घेतली असून, सर्व यंत्रणा तात्काळ मदातकार्यास लागली आहे.
नालासोपारा येथून एक खाजगी बस निघाली होती. MH 04 FK 6616 असा या अपघात झालेल्या गाडीचा नंबर असून. ही  बस पुलावरुन 60  फूट खाली कोसळली.
प्राथमिक माहितीनुसार ठाणे येथून श्रीवर्धन येथील म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील ठाणे येथे राहणारे नागरिक आपल्या गावाला एका कार्यक्रमासाठी म्हसळा येथे येत असताना हा अपघात झाला. युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे.
दरम्यान मृतांची ओळख पटविण्याबाबतची कार्यवाही व तपास सुरु करण्यात आला आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!