पनवेलच्या राजकीय आणि सामाजिक परिप्रेक्ष्यात सतत नवनवीन उपक्रम, बांधिलकी आणि लोकाभिमुख नेतृत्वाने आपली एक वेगळी छाप उमठवणारे नाव म्हणजे परेश रामशेठ ठाकूर. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि त्यांचे मोठे बंधू आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासारख्या थोर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, परेश ठाकूर यांनी महाराष्ट्राच्या नागरी, सांस्कृतिक व सामाजिक विकास क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पनवेलच्या समृद्ध आणि संस्कृतीप्रधान वातावरणात वाढलेले परेश ठाकूर यांनी लहानपणापासूनच समाजसेवेचे बाळकडू घेतले. त्यांच्या वडिलांकडून, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याकडून ‘लोकांना केंद्रस्थानी ठेवून नेतृत्व’ ही शिकवण त्यांनी आत्मसात केली. त्यांच्या मोठ्या बंधू आमदार प्रशांत ठाकूर यांच्याही प्रभावी नेतृत्वातून प्रेरणा घेऊन, त्यांनी ही शिकवण आपल्या जीवनात साकारली. हीच शिकवण त्यांच्या प्रत्येक टप्प्यात अधिक प्रगल्भ होत गेली.
आपली सार्वजनिक सेवा यात्रा त्यांनी पनवेल महानगरपालिकेचे पहिले सभागृह नेते म्हणून सुरु केली. त्यांनी भाजप गटनेते आणि नगरसेवक म्हणून कार्यरत असताना, विकास योजना, पायाभूत सुविधा नियोजन आणि लोकाभिमुख प्रशासन क्षेत्रात मोठा ठसा उमठवला.
शिक्षण क्षेत्रातही ठाकूर यांचे योगदान लक्षणीय आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि रयत शिक्षण संस्थेअंतर्गत विविध शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष आणि संचालक म्हणून त्यांनी रायगड जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आधुनिक शिक्षण सुविधांनी समृद्ध केले, हजारो विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाची संधी दिली.
सांस्कृतिक क्षेत्रात ‘अखिल भारतीय नाट्य परिषद – पनवेल शाखा’चे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी तरुण व उदयोन्मुख रंगकर्मींसाठी ‘अटल करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून एक भक्कम व्यासपीठ निर्माण केले आहे. सलग ११ वर्षे चालणारी ही स्पर्धा महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांसाठी एक प्रेरणास्थान ठरली आहे.
क्रीडा क्षेत्रात ठाकूर यांच्या दूरदृष्टीमुळे पनवेलमध्ये जिल्ह्यातील एकमेव अद्ययावत अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट अकादमीची उभारणी झाली. रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, उलवेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी स्थानिक तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अथक परिश्रम घेतात. त्यामुळे स्थानिक युवकांना क्रीडा क्षेत्रात व्यावसायिक स्तरावर पुढे जाण्यासाठी मोठी प्रेरणा मिळाली आहे.
सामाजिक उत्तरदायित्वाच्या क्षेत्रातही ठाकूर यांचा ठसा अमीट आहे. ‘कोशिश फाउंडेशन’ या मंचाच्या माध्यमातून त्यांनी व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व विकास आणि शाश्वत जीवनशैलीसाठी प्रभावी उपक्रम हाती घेतले आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली ‘आमदार प्रशांत ठाकूर ट्रॉफी’ वक्तृत्व स्पर्धेत १७,००० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले असून, ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी वक्तृत्व कौशल्य आणि सजग नागरिकत्व रुजवण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ ठरली आहे.
पर्यावरण क्षेत्रातही त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव, ‘ऑक्सी पार्क’, ‘ग्रीन पार्क’, ‘मियावाकी फॉरेस्ट’ यांसारख्या प्रकल्पांमुळे त्यांनी पनवेलमध्ये शाश्वत जीवन शैलीचे व नवे मापदंड निर्माण केले आहेत.
परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास झाला आहे. रस्ते, वीज व्यवस्था, उद्याने, जलपुरवठा योजना आणि नागरी सुविधा यामध्ये त्यांच्या दूरदृष्टीमुळे परिवर्तन घडले आहे. त्यांच्या कारभाराचा मुख्य आधार म्हणजे लोकांच्या अडचणींना समजून घेऊन, लोकसहभागातून आणि शाश्वत नियोजनातून त्या सोडवण्याची त्यांची भूमिका. कुणीही त्यांच्याशी थेट संपर्क करू शकतो, हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे.
आपल्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या या सामाजिक समर्पित जीवनाला सलाम करत, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो – परेश ठाकूर, आपली प्रेरणादायी वाटचाल नव्या पिढ्यांना स्फूर्ती देवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
