पनवेल दि. १८ (संजय कदम) : काश्मीर येथील पहलगाम या पर्यटन स्थळी पाकिस्तान अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबार व युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील बोरले येथील गेल इंडिया येथे मॉकड्रिल चे आयोजन करण्यात आले होते.
पनवेल तालुका पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मॉकड्रिल मध्ये पोलीस ठाणे कडील ६ अधिकारी व २२ अंमलदार, झोन 2 स्ट्राइकिंग विभागाचे २ अधिकारी, १२ अंमलदार, क्यूआरटी विभागाचे १ अधिकारी 25 अंमलदार, ॲम्बुलन्स, 1 डॉक्टर, दोन मदतनीस, सुरक्षा शाखा १ अधिकारी, विशेष शाखा १ अंमलदार, दोन अग्निशमन व त्यावरील अंमलदार यांनी सहभाग घेतलेला होता. मॉकड्रिल दरम्यान दोन सशस्त्र इसम यांनी कंपनीचे 5 कामगारांना बंदी केले असल्याबाबत चा बनाव केला गेला होता.