पनवेल दि.२: ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित गौरवग्रंथाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनामुळे मोजक्या उपस्थितांसमोर आज लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी या ग्रंथाचे प्रकाशन झाले.
या ग्रथांत एकूण 55 लेख असून, यामध्ये मान्यवर, निकटवर्तिय, मित्र, कुटुंबीय, तसेच त्यांच्या शिष्यांचे लेख आहेत. यावेळी पनवेल गजलग्रुपतर्फे त्यांना 75 हजार रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. ही थैली त्यांनी गजलग्रुपचे रोहिदास पोटे यांच्याकडे नवोदित गजलकारांच्या संग्रहासाठी मदत म्हणून सुपूर्द केली.
या समारोहाप्रसंगी नवोदित गजलकारांच्या संग्रहासाठीच्या मदतीमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वतःतर्फे आणखी 75 हजार रुपये देण्याचे जाहीर केले.
या सोहळ्यात गौरवग्रंथाचे संपादक रोहिदास पोटे, संदीप बोडके, अॅड. माधुरी थळकर, सतिष अहिरे, गणेश म्हात्रे, समीर शेख, सलिल शेख, गणेश कोळी, साहिल शेख, रेहान सय्यद आदी उपस्थित होते.