अलिबाग,दि.3: पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी व प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचे करोनाने आज पहाटे निधन झाले. राजेंद्र सरग यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.
कार्यतत्पर,मनमिळावू, शांत, सुस्वभावी म्हणून त्यांचा प्रशासन, माध्यम व सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक होता. कला व साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकताच त्यांचा करोना काळातील उत्कृष्ट कामाबद्दल गौरवही करण्यात आला होता.
मागील रविवारी त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले. त्यातच हाय शुगर डिटेक्ट झाली. शेवटपर्यंत शुगर लेव्हल खालीच आली नाही. अखेर त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.