पनवेल, दि. १: शासनाने कोविन पोर्टल तसेच आरोग्य सेतूद्वारे लसीकरण सुविधा ४५ वर्षावरील सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणास वेग मिळाला आहे.
शासनाच्या नव्या नियमानुसार वय वर्षे ४५ वरील सर्व नागरिकांसाठी दि.०१एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० वाजेपासून
१. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र जुने पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे.
२) उपजिल्हा रुग्णालय-पनवेल.
३) टाटा हॉस्पिटल- खारघर याठिकाणी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे.
तसेच वय वर्षे ४५ ते ६०च्या दरम्यान असलेले प्रसारमाध्यम प्रतिनिधी तसेच ६० वर्षावरील सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि त्याच प्रवर्गातील त्यांच्या कुटुंबियांकरिता लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रसारमाध्यम प्रतिनिधींना विनंती की, शासकीय लसीकरण केंद्रातील संबंधित लसीकरण समन्वय आरोग्य अधिकाऱ्याशी संपर्क साधून आपले व आपल्या कुटुंबियांचे कोविड लसीकरण करुन घ्यावे.
ही लसीकरण मोहीम सध्याच्या लसींच्या उपलब्ध साठ्यानुसार सुरु राहील व लसींचा नवीन साठा उपलब्ध झाल्यावर पुढेही चालूच राहील, कृपया याची प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी नोंद घ्यावी.
या नवीन टप्प्यातील लसीकरणासाठी शासकीय ८ व खाजगी १३ लसीकरण केंद्रे महानगरपालिकेच्यावतीने सुरू करण्यात आली आहेत. नागरी आरोग्य केंद्र नवीन पनवेल तसेच पूर्वीच्या खाजगी रुग्णालयांमध्ये वाढ करण्यात आली असून तळोजा येथील व्यंकटेश रूग्णालय , कॅलेड्रियस रूग्णालय या ठिकाणी देखील लसीकरणाची सोय लवकरच सुरू होणार आहे.
आजचे लसीकरण
४५ वर्षावरील नागरिक – १२०४
जेष्ठ नागरिक – ९९४
एकुण लसीकरण – ५२४३२