पनवेल दि.२०: महाराष्ट्र दौर्‍यावर आलेले केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी आज पनवेल येथील खांदा कॉलनीमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरला भेट देऊन विभागाचा आढावा घेेतला.
या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, केंद्रीय आर्थिक सल्लागार निलम्बुज शरण, राष्ट्रीय जन स्वास्थ्य प्रशिक्षण व अनुसंधान संस्थानचे संचालक डॉ. सुनील गीत्ते, सहसंचालक डॉ. सुधीर वंजे, डॉ सुपर्णा खेरा, डॉ. दीपक राऊत, डॉ. अमोल आडे आदी उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये शंभर बेडचे अ‍ॅडव्हान्स ट्रॉमा केअर सेंटर आणि महापालिका क्षेत्रात प्रसूती व बालसंगोपन केंद्र उभारण्यात यावे या मागण्यांचे निवेदन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांना दिले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133