उरण दि.२० (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील पाले गावात भारत सरकारचे कॉमन सर्विस सेंटर (CSC) व महाराष्ट्र शासनाचे आपले सरकार सेवा केंद्र तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या BC पॉईंट चे उद्घाटन नुकतेच उरण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. तळागाळातील नागरिकांना शासनाच्या सर्व सेवा सुविधा तात्काळ मिळाव्यात म्हणूनच या सेंटरची स्थापना करण्यात आली असे केंद्र प्रमुख व सामाजिक कार्यकर्त्या स्मिता म्हात्रे यांनी संबंधितांना माहिती देताना सांगितले. यावेळी गावातील होतकरू तरुण घरची गरीब परिस्थिती असताना सुद्धा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले रोहित म्हात्रे व ऋषिकेश म्हात्रे यांचा नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी उरण भाजप शहराध्यक्ष संम्पूर्णा थळी, हास्य सम्राट संजीवन म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष ठाकूर, निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक पोसुराम म्हात्रे, निवृत्त शिक्षक विष्णू म्हात्रे, पाले गाव अध्यक्ष अमित म्हात्रे, शासकीय अधिकारी रजनीकांत घरत,रुपाली म्हात्रे, कामिनी म्हात्रे, संगीता म्हात्रे, दर्शना म्हात्रे, रविना म्हात्रे, राजेश म्हात्रे, रमाकांत म्हात्रे, संदीप म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे, शेखर म्हात्रे, धनेश्वर म्हात्रे, हिरामण म्हात्रे, रामदास म्हात्रे, पांडुरंग म्हात्रे, प्रितम म्हात्रे आदी मान्यवर तसेच पाले गावातील ग्रामस्थ हजर होते.