पनवेल दि.५: आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील सुपुत्र व नवी मुंबई पनवेल येथून दैनिक युवक आधारच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संतोष शिवदास आमले यांना World Cultural and Educational Organisation तर्फे ‘Honorary Doctorate Award’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान मिळाल्याने परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर संस्था भारत सरकार मान्यताप्राप्त असून, संस्थेच्या मूल्यांकन मंडळाने संचालक व अध्यक्ष यांच्या अधिकाराने हा सन्मान जाहीर केला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे निष्ठावान, धडाडीचे व समाजाभिमुख कार्य लक्षात घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
आमले यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत सामान्य जनतेच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने केले आहे. त्यांच्या लेखणीने समाजप्रबोधन घडवून आणत जनजागृतीची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
‘दैनिक युवक आधार’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, विविध वर्तमानपत्रांमध्ये उपसंपादक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम पाहिले आहे. सध्या ते नवी मुंबई, पनवेल येथे वास्तव्यास असून ‘दैनिक युवक आधार’चे सर्व कामकाज ते समर्थपणे सांभाळत आहेत.
त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि जनहिताचा ध्यास स्पष्टपणे दिसून येतो. पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता समाजसेवेचे प्रभावी साधन म्हणून त्यांनी जपले आहे.
या सन्मानामुळे अंभोरा गावासह आष्टी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संतोष आमले यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळत असून, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!