पनवेल, दि. १४: पनवेल महानगरपालिका मुख्यालयात संगमरवरी दगडावर कोरलेल्या संविधान उद्देशिकेचे अनावरण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक १४ एप्रिल रोजी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त भारत राठोड,माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक ॲड. प्रकाश बिनेदार ,सहाय्यक संचालक (नगररचना) केशव शिंदे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपयुक्त सर्वश्री डॉ. वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, मंगला माळवे, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
संविधानाची उद्देशिका ही भारतीय संविधानाच्या सुरुवातीला दिलेली एक महत्त्वाची भूमिका आहे. या उद्देशिकेमध्ये भारताच्या संविधानाची मूलभूत तत्त्वे, मूल्ये आणि ध्येय स्पष्टपणे नमूद केलेली आहेत. उद्देशिका ही आपल्या संविधानाचा आत्मा असून ती आपल्याला संविधानाचे मूलभूत मार्गदर्शक तत्त्व समजून घेण्यासाठी मदत करते.
तसेच यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!