पनवेल दि.२१: जागतिक योग दिनानिमित्त आज भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत युवा व ज्येष्ठांनी निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या माची प्रबळगड येथे योगासने केली.
यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ योग अँड आयुर्वेद आणि आरोग्य सेवा समिती पनवेल यांच्यावतीने मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी योग केंद्र प्रमुख सूर्यकांत फडके यांनी योग संदर्भात मार्गदर्शन केले. तर योगसाधक अरविंद गोडबोले, नैना म्हात्रे, सारिका शेलार, श्रुती शेलार यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली.
श्वसन मार्ग शुद्ध करणारी, फुफ्फुसांना बळकटी देणारी ‘जलनेती’ ही शुद्धीक्रिया करोना काळात सर्वांसाठी लाभदायक ठरली. २१ जून जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने माची प्रबळगड येथे योग्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी, उत्तर रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष रोहित जगताप, सुभाष पाटील, अमोघ प्रशांत ठाकूर, आदेश परेश ठाकूर, वारदोली ग्रामस्थ, तसेच राकेश भुजबळ, हर्षवर्धन पाटील, सुमित झुंझारराव, अभिषेक भोपी, अक्षया चितळे, तेजस जाधव, अक्षय सिंग, साहिल नाईक, उदित नाईक, ऋषी साबळे, रोहन माने, शुभम कांबळे, अमेय देशमुख, श्रावण घोसाळकर, तेजस जाधव, देवांशू प्रबाळे तसेच युवा व ज्येष्ठ योगा प्रेमींनी योगासने केली.
♦️जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने आणि एकतेने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा होता प्राख्यात योग प्रशिक्षक श्रद्धा हिरे यांच्या नेतृत्वाखाली या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
♦️आज सकाळी ७.०० ते ८.०० या वेळेत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पोलीस मुख्यालय मैदान, अलिबाग येथे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, नेहरू युवा केंद्र, प्रिझम सामाजिक विकास संस्था,अलिबाग आणि अंबिका योग कुटीर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिर संपन्न झाले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने,अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, तहसिलदार सचिन शेजाळ, स्त्रीरोग तज्ञ डॉ. मेघा घाटे, ॲड. श्रीमती कलाताई, अध्यक्ष लायन्स क्लब श्रीबाग, वीरेंद्र पवार, संचालक,अंबिका योग कुटीर संस्था, मोकळ, आर.पी आय, पोलीस मुख्यालय अलिबाग, स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा तथा स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी, बार्टी समता दूत- अनुजा पाटील, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्या तपस्वी गोंधळी, अंबिका योगा कुटीर अलिबागच्या माधवी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.