रायगड दि.3: रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे 15 शिक्षक व 1 विशेष पुरस्पर प्राप्त शिक्षक यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन एकूण 16 प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्हा आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी दिली आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्म दिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षण हा समाजाचा सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज व राष्ट्राचा विकास होतो. प्राथमिक शिक्षक जिल्हयातील ग्रामीण भागातील तळागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांना टिकवणे व शिकवणे या सारखे मोलाचे कार्य करतात. तसेच शैक्षणिक क्षेत्राला गुणवत्तेला स्वतःच्या नवप्रकल्पाव्दारे दिशा देण्याचे कार्य करतात. शालेय स्तरावर विविध सहशालेय उपक्रम राबवितात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परिश्रम घेतात अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव करणे यथोचित आहे. त्याच हेतूने त्यांना प्रोत्साहन देण्याकरीता त्यांचा सन्मान करण्याकरीता ग्राम विकास विभागाकडील दि.12 डिसेंबर 2000 रोजीच्या परिपत्रकान्वये व विभागीय आयुक्त यांच्या मान्यतेने पुरस्कार निवडीचे निकषाच्या आधारे 5 सप्टेंबर या दिवशी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण केले जाते. याकरीता प्रत्येक तालुक्यातून एका आदर्श शिक्षकाची निवड केली जाते व एका शिक्षकाला विशेष (कला, क्रिडा व अपंग) पुरस्कार जाहीर केला जातो.

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2024-25 निवड केलेल्या शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे :-
अजित सिताराम हरवडे उपशिक्षक,राजिप शाळा सहाणगोठी आदीवासीवाडी अलिबाग
भास्कर भिवा पाटील, उपशिक्षक,राजिप शाळा मांगरुळ पेण
जयदास बाबुराव घरत, उपशिक्षक,राजिप शाळा वडघर, पनवेल
भगवान परशुराम घरत, पदवीधर शिक्षक, राजिप शाळा वदप, कर्जत
राजेंद्र कमळू फूलावरे, उपशिक्षक, राजिप शाळा वडविहीर, खालापूर
सुचिता गजानन जोशी, उपशिक्षिका, राजिप शाळा जासई, उरण
जनार्दन नाना भिलारे, विषय शिक्षक, राजिप शाळा सिद्धेश्वर, सुधागड
लिना किशोर सुर्वे, पदवीधर शिक्षिका, राजिप शाळा कोलाड, रोहा
श्रद्धा सुधीर मांडवकर, विषय शिक्षका राजिप शाळा शिरगांव, महाड
प्रशांत सुरेश वाणी, विषय शिक्षक, राजिप शाळा शेखाडी मराठी, श्रीवर्धन
रमेश गोविंदराव जाधव, उपशिक्षक, राजिप शाळा निगडी, म्हसळा
चंद्रकांत धोंडू उतेकर, पदवीधर शिक्षक, राजिप शाळा कापडे खुर्द, पोलादपूर
अपूर्वा अमोल जंगम, उपशिक्षिका,राजिप शाळा कशेने, माणगाव
अमिष महादेव भौड, उपशिक्षक, राजिप शाळा गायमुख, तळा
देवानंद दत्तात्रय गोगर, उपशिक्षक राजिप शाळा ताडवाडी मुरुड.

विशेष शिक्षक पुरस्कार (दिव्यांग)
महेश भगवान पाटील, उपशिक्षक राजिप शाळा बोरगाव,पेण.

जल रंग चित्रकार – KEVIN DIAS

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!