पनवेल दि.१८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. पनवेल १८८ विधानसभा मतदारसंघ, निवडणूक विभाग अंतर्गत आचारसंहिता पथकांतर्गत स्थिर सर्वेक्षण पथकने दि. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ०७:३० वाजण्याचे दरम्यान पुणे ते जुने मुंबई हायवेच्या दिशेने जाणाऱ्या शेडूंग चेक पोस्ट येथे रोडवरून जाणाऱ्या एमजी ग्लोस्टर कंपनीची सिल्व्हर ग्रे रंगाची चार चाकी गाडीस थांबवून तपासणी केली असता, त्या गाडीत असलेल्या काळ्या रंगाच्या बॅग मध्ये १ पिस्टल, २ मॅगझीन, १२ जिवंत राउंडसह दोन लाख तेहतीस हजार पाचशे पन्नास रुपयांची रोख रक्कम आढळून आली. सदरची रक्कम संशयास्पद असल्याने स्थिर सर्वेक्षण पथक क्र.०८ मार्फत सदरील रोख रक्कम जप्त करुन कोषागार कार्यालय पनवेल येथे जमा करण्यात आली व जप्त करण्यात आलेले अग्नीशस्त्र पनवेल तालुका पोलीस ठोणे यांच्या कडे पुढील तपास व कार्यवाहीसाठी सुपूर्त करण्यात आले.
सदर कारवाई १८८ पनवेले विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाई वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील, आचारसंहिता पथक प्रमुख भारत राठोड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, संदिप कराड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, संजय भालेराव, सहाय्यक खर्च निरिक्षक, विजय फासे, सहाय्यक खर्च निरिक्षक, संजय आपटे, आचारसंहिता पथक प्रमुख महेश पांढरे, आचार संनियंत्रण अधिकारी, शरद गिते, आचारसंहिता पथक सहाय्यक प्रमुख जी. एस. बहिरम, सहा. समन्वयक आचारसंहिता कक्ष, दिनेश भोसले तुषार म्हात्रे, नितेश चिमणे, आशा डोळस, तसेच स्थिर सर्वेक्षण पथक क्र. ०८ पथकाचे प्रमुख किरण भगत, सहा. पथक प्रमुख, देवा केसला, खारघर पोलीस ठाण्याचे पोशी. गोपाल चव्हाण, खारघर पोलीस ठाण्याचे पोशी. युवराज दिवे उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!