पनवेल दि.४: खारघर रेसिडेन्सिअल वेलफेअर असोसिएशन अर्थात KRWA कारवा या सामाजिक संस्थेने जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून यावर्षीच्या #beat plastic pollution थीम ला अनुसरून खारघर मधील नागरिकांना प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम व सिंगल युज प्लास्टिक वापरा विरोधात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देश्याने आज रविवार दिनांक ४ जुन रोजी सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले.
आज सकाळी ६ वाजल्यापासून खारघर सेक्टर 12 मधील गावदेवी मैदानातून या रॅलीला सुरुवात झाली. वॉर्म अप म्हणून सर्वांनी झुंबा डान्स चा आनंद घेतला व ठीक ७ वाजता रॅलीला सुरुवात झाली. ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेत ५oo पेक्षा जास्ती नागरिकांनी व विविध संस्थानी उत्स्फूर्तपणे या रॅल्लीत सहभाग नोंदवला.
या रॅली ची सुरुवात पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर यांनी झेंडा दाखवून केला व कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी, वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी आणि मानवी आरोग्याचे रक्षण करण्यासाठी प्लॅस्टिक प्रदूषणाला कमी करणे महत्वाचे आहे. तसेच खारघर रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशन चे कौतुक ही केले.
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले की, सरकारी कायदे आणि लोकसहभागानेच अश्या मोहीमा यशस्वी होऊ शकतात. लक्षात ठेवावे लागेल की प्लास्टिक पूर्णपणे बंद करणे शक्य नाही; परंतु सिंगल युज प्लास्टिक बंद करणे यासाठी असले उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे.
कारवा या संस्थेचे सचिव दीपक शिंदे म्हणाले की, सिंगल यूज प्लास्टिकची मागणी करणार नाही आणी वापरणार ही नाही अशी मनाशी खूणगाठ बांधली तरच खऱ्या अर्थाने या सुवर्णवर्षी जागतिक पर्यावरण दिनाचा हेतू साध्य होईल.
ही रॅली यशस्वी करण्यासाठी कारवा चे अध्यक्ष अमर उपाध्याय, संस्थेचे सदस्य व खारघरचे सर्व माजी लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेतला होता. या रॅलीला पनवेल, नवी मुंबई व खारघर मधील अनेकांनी सहभाग नोंदवला होता. पनवेल येथील रनेथॉन सायकलिंग क्लब चे पुरण सिंग मेहरा, फिटनेस ग्रुप अरुण खेडवाल, पर्यावरण प्रेमी व अभ्यासक छाया तरळेकर आदी मान्यवरांनी यात सहभाग घेतला.
याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, भारतीय जनता पार्टी,खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक हरेश केणी, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, नगरसेवक नरेश ठाकुर, नगरसेवक प्रवीण पाटिल,नगरसेविका अनिता पाटिल, सरचिटणीस कीर्ती नवघरे, सरचिटणीस दीपक शिंदे, वासुदेव पाटिल, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, नमो नमो मोर्चा चे संतोष शर्मा, सोशल मीडिया संयोजक अजय माली,महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, सोशल मीडिया सहसंयोजिका मोना आडवाणी, चिटणीस अंकिता वारंग, अश्विनी भुवड, शोभा मिश्रा, युवा मोर्चा सरचिटणीस अमर उपाध्याय, राजेन्द्र अग्रवाल, कविता अग्रवाल, रामकुमार चौधरी ,युवा मोर्चा उपाध्यक्ष शुभ पाटिल,अक्षय लोखंडे, नितेश पाटिल, किरण रानावड़े, शैलेन्द्र त्रिपाठी, सुस्मित डोलस, नवल कुमार मोरे, राजेंद्र मांजरेकर, रमेश खड़कर, दीपक ठाकुर, समीर कदम, सर्जेराव मेंगाने, मधुमिता जेना, सीमा खडसे, श्यामला सुरेश, मीनाक्षी अंथवाल, निर्मला यादव, सुशीला शर्मा,चांदणी अवघडे,मायासिंग, योगिन्द्रम कोट्टरी, अशोक पवार इत्यादी कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते.