पनवेल दि.५: देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून नऊ वर्षांत समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी कार्य करण्यात आले. देशातील ८० कोटी गरिबांना दरमहा धान्य, चार कोटी कुटुंबांना घरे, पाच कोटी नागरिकांना मोफत उपचार, ग्रामीण भागात १२ कोटी घरांमध्ये पाणी देण्याबरोबरच फेरीवाले, नवउद्योजक, विद्यार्थ्यांसह परदेशस्थ भारतीयांच्या अडचणीवेळीही केंद्र सरकार पाठीशी राहिले आहे, त्या अनुषंगाने मावळ लोकसभा मतदार संघात महाजनसंपर्क अभियान आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व मावळ लोकसभा अभियान प्रमुख संजय उर्फ बाळा भेगडे यांनी आज पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजपातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘मोदी @९’ कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी कार्याची माहिती देण्यासाठी भाजपाच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेस भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, आमदार उमाताई खापरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, शंकर जगताप, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, वैशाली डहाळे, शंकर भोईर, अविनाश कोळी, चंद्रकांत नखाते, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा आश्विनी पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहेरे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस मयुरेश नेतकर, ओबीसी सेलचे राजेश गायकर, आदी उपस्थित होते.
संजय भेगडे यांनी पुढे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा दिला गेला. कोरोना आपत्तीत संकटात कोणीही उपाशी राहू नये यासाठी ८० कोटी गरीबांना मोफत अन्नधान्य दिले गेले. तर कोरोनाला हरविण्यासाठी २२० कोटी डोस मोफत दिले गेले. जगातील सर्वात मोठा आरोग्य सेवा कार्यक्रम आयुष्यमान भारत अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आणि त्या माध्यमातून आता पर्यंत तब्बल ५ कोटी नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील ९ कोटी ६० लाख कुटुंबांपर्यत मोफत गॅस, देशातील एक लाख फेरीवाल्यांना कर्ज उपलब्ध करून दिले गेले. त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सर्वोच्च मानून अत्याधुनिक उपकरणांसह सशस्त्र दलांना सक्षम केले, देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या. तसेच अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर, वंचित घटकांसाठी साडेसात हजार कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत ५ हजार १८२ कोटी रुपये, लाभार्थीच्या थेट खात्यात २९ लाख कोटी रुपये देण्यात आले. केंद्र सरकारकडून थेट अनुदान मिळत असल्यामुळे भ्रष्टाचार बंद झाला. डिजिटल भारत क्रांती, आत्मनिर्भर भारत, ‘पीएम किसान योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये, बियाणे खरेदीसाठी कर्जाची गरज नाही, स्टँड-अप ‘स्टँड अप इंडिया’ योजनेंतर्गत वंचित घटकांतील १ लाख ८० हजार नवउद्योजकांना ४० हजार ७०० कोटी मंजूर केले. देशातील नवोदित होतकरू खेळाडूंसाठी खेलो इंडिया उपक्रम, जनऔषधी केंद्रांमधून स्वस्त औषधांच्या माध्यमातून २० हजार कोटींची बचत, ३४ कोटींहून अधिक सॅनिटरी पॅडचे १ रुपयांत वितरण आणि पीएम मातृ वंदना योजनेअंतर्गत ३ कोटी ३ लाखांहून अधिक महिलांना मदत दिली गेली, तसेच स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून १२ कोटी शौचालयांचे निर्माण, अशी विविध लोकोपयोगी योजना देशातील नागरिकांना देत त्यांची यशस्वीपणे अंमलबजावणीही करण्यात आली, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर देशाच्या विकासासाठी घेतलेल्या अनेक निर्णयांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे आभारही मानण्यात आले.
‘मोदी @९’ कार्यक्रमांतर्गत मावळ लोकसभा मतदार संघात महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने, मोदी सरकारच्या काळात झालेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी ‘विकास तिर्थ’, डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनिअर यांचे ‘प्रबुद्ध नागरी संमेलन’, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोदी सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठींबा देणाऱ्यांचे ‘सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर संमेलन’, विशाल रॅली, जाहीर सभा, योग दिन, ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन, लाभार्थी संमेलन, व्यापारी संमेलन, व्हर्च्युअल रॅली, घरोघरी संपर्क अभियान, संयुक्त मोर्चा संमेलन अशी विविध कार्यक्रमे होणार असल्याचीही माहिती संजय भेगडे यांनी दिली. त्याचबरोबर मावळ, पिंपरी चिंचवड परिसरात केंद्राच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचा आढावाही त्यांनी मांडला.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना सांगितले कि, कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारला ९ वर्ष पुर्ण झाले आहे. त्या अनुषंगाने मोदी @९ महासंपर्क अभियान अंतर्गत सेलिब्रेशन ऐवजी नागरिकांशी कम्युनिकेशन असे कार्यक्रमे आयोजित करण्यात आले आहेत. मागील ९ वर्षात आपण अतिशय गतिमान सरकार पहिले, प्रचंड विकासात्मक कामे आपण पहिली. विविध योजनेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला मदत करून विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त कारभार देशातील जनतेने पाहिला. त्याची फलश्रुती म्हणून भारताची प्रतिमा जगात उंचावत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून गरीब कल्याणाचे विविध आयाम तयार करून त्यांचे अधिकार पोहचविण्याचे काम केले. गावा, शहराची देशात आणि देशाची जगात एक वेगळी ओळख मागील नऊ वर्षात माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात झाली आहे. यावेळी पनवेल उरण परिसरातील विकास कामांचा आढावा सादर करताना, केंद्र सरकारमुळे विमानतळाच्या कामाला वेग, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक एमटीएचएल, नेरुळ ते खारकोपर रेल्वे नंतर पुढे उरण पर्यंत रेल्वे धावण्यासाठी सज्ज, मुंबई वडोदरा एक्स्प्रेस हायवे- दिल्ली मुंबई हायवे जेएनपीटीला जोडण्याचे काम, जलजीवन मिशन अंतर्गत गाव खेड्यापाड्यात पाणी पुरवठा योजना, तसेच राज्य सरकार, एमएमआरडीए, महापालिका, यांच्या माध्यमातून प्रचंड विकासकामांमुळे पनवेल उरण परिसराचे चित्र बदलत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी सांगितले कि, आपण सर्वानी २००४ ते २०१४ पर्यंत युपीए सरकार पाहिले, जनतेच्या हिताची कामे न करणे हे त्यांचे महत्वाचे काम होते. कामचुकारपणा करणे हिच त्यांची निती व धोरण होते. मोठ्या प्रमाणात घोटाळे हे आपण युपीए सरकारच्या कार्यकाळात झालेले आपण पाहिलेले आहे. ह्या युपीए सरकारच्या घोटाळ्यांना कंटाळून २०१४ ला जनतेने ठरवले आणि मोठ्या प्रमाणात समर्थन नरेंद्रजी मोदी यांना जनतेने दिले. मागील ९ वर्षात आपण अतिशय गतिमान सरकार पहिले, प्रचंड विकासात्मक कामे आपण पहिली. विविध योजनेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला मदत करून विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याने या काळात झालेल्या कामांची माहिती देण्यासाठी ३० मे ते ३० जून पर्यंत महाजनसंपर्क अभियान आयोजित करण्यात आले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!