मुंबई, दि. ४: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर यांचे निधन मुंबईतील दादर येथे एका खासगी रुग्णायलयात निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दादरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.सुलोचना दीदींच्या जाण्यानं मराठी चित्रपट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. दीदी या काही दिवसांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त होत्या.
“पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनामुळे काळाने आपल्यातून ओढून नेली आहे. मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शोकमग्न भावना करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सुलोचना दीदी यांना निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सुलोचना दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻