रायगड, दि. ३: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २१० ग्रामपंचायतींपैकी १२४६ सदस्य पदांसाठी व १६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच तर ५ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. २१० सरपंच पदांपैकी ३८ पदे बिनविरोध तर १८५४ सदस्य पदांपैकी ५६४ सदस्य पदे बिनविरोध झाली आहेत अशी माहिती उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विठ्ठल इनामदार यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातील १५, मुरुड १५, पेण ११, पनवेल १७, उरण ३, कर्जत ७, खालापूर २२, रोहा १२, सुधागड १३, माणगाव २६, तळा ६, महाड २१, पोलापुर २२, श्रीवर्धन ८ आणि म्हसळा १२ अशा २१० सार्वत्रिक निवडणूक तर ९९ सदस्यपदांसाठी आणि १० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्जांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी, २५ ऑक्टोबर रोजी अर्ज माघारी अशी प्रक्रीया पार पडली आहे. आता ५ नोव्हेंबर रोजी मतदान व ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायतींतील १८५४ सदस्यांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. १८५४ जागांपैकी माणगाव, तळा, मुरुड, पनवेल, महाड, पोलादपूर श्रीवर्धन, म्हसळा येथील ४४ जागांवर एकही अर्ज दाखल झाला नाही. तर अलिबाग ५, मुरुड २४, पेण ३६, पनवेल १३, उरण २, कर्जत ४, खालापूर ४९, रोहा १६, सुधागड २३, माणगाव १२०, तळा ३८, महाड ७४, पोलादपूर ६८, श्रीवर्धन २९ आणि म्हसळा ६३ अशा एकूण ५६४ सदस्य पदे बिनविरोध झाली आहेत. त्यामुळे आता अलिबाग १५२, मुरुड ११०, पेण पनवेल ७५, १६१, उरण ३९, कर्जत ६३, खालापूर १५३, रोहा ९८, सुधागड ८८, माणगाव ९८, तळा ९, महाड ७०, पोलादपूर ९१, श्रीवर्धन २० आणि म्हसळा १९ अशा एकूण १२४६ सदस्य पदांसाठी निवडणूक मतदान होईल.
थेट सरपंच पदांच्या २१० जागांपैकी महाड, पोलादपूर येथे प्रत्येकी एक व श्रीवर्धन येथे दोन अशा चार ठिकाणी एकही वैध अर्ज दाखल झालेला नाही. तर उमेदवारी अर्ज माघारीनंतर मुरुड,पेण, तळा, श्रीवर्धन येथे प्रत्येकी दोन, सुधागड येथे तीन, पोलादपूर, माणगावात प्रत्येकी पाच, महाडमध्ये आठ तर म्हसळा तालुक्यात नऊ अशी एकूण ३८ सरपंच पदे बिनविरोध झाली आहेत. त्यामुळे आता अलिबाग १५, मुरुड १३, पेण ९, पनवेल १७, उरण ३, कर्जत ७, खालापूर २२, रोहा १२, सुधागड १०, माणगाव २१, तळा ४, महाड १२, पोलादपूर १६, श्रीवर्धन ४आणि म्हसळा ३ अशा एकूण १६८ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे.