ठाणे, दि. ६ : विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने कोकणातील १६५ आदर्श शिक्षक व ११ संस्ठाचालकांचा वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन काल ठाण्यातील एम. एच. हायस्कूलमध्ये सन्मान करण्यात आला.
आदर्श क्षैक्षणिक समूह संचलित श्री बापूसाहेब डी. डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन, नविन पनवेल च्या प्राचार्या अॅड. डॉ सीमा कांबळे यांना भारतीय जनता पार्टी, शिक्षक आघाडी कोकण विभाग यांच्यातर्फे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल ठाणे येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजनजी डावखरे, ठाण्याचे आमदार संजयजी केळकर, कोकण शिक्षण मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे , संगिता जी विसपुते यांच्याप्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम सम्पन्न झाला.
डॉ. सीमा कांबळे यांनी अध्यापन शास्त्र व सामाजिक संशोधन हया क्षेत्रात मागील काही वर्षात अनेक परीसंवाद, कार्यशाळा, शिक्षकांसाठी शिक्षण परिषदांचे आयोजन तसेच सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून भरीव असे कार्य आहे. तसेच नविन शैक्षणिक धोरण २०२० च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ते करत असलेल्या कार्याची दखल यापूर्वीच प्रसार माध्यमांनी घेतली आहे. डॉ. सीमा कांबळे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल भारतीय जनता पार्टी, पदवीधर प्रकोष्ठ, महाराष्ट्र राज्य चे प्रदेश संयोजक तथा आदर्श क्षैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराजजी विसपूते, संचालिका संगीता विसपुते यांनी प्राचार्य डॉ. सीमा कांबळे यांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.