महाड दि.३: महाड एमआयडीसीमधील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात असलेल्या ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीत आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये पाच कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना एमएमएसीइटीपी. हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड हेल्थकेअर प्रा. लि. या कंपनीमध्ये आज सकाळी आग लागून भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीच्या प्लांटमध्ये असलेल्या एका रिएक्टरचा स्फोट झाला. यामुळे आग पसरली गेली आणि इतर रिएक्टर्सचे एका मागून एक असे स्फोट होत गेले. या स्फोटांच्या दणक्याने कामगार जिकडे वाट मिळेल तिकडे पळू लागले. शेजारी असलेल्या विरल, झुआरी आणि अक्वाफार्म या कंपनीतील कामगारांनीदेखील कंपनी बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. ज्या प्लांटला आग लागली त्या प्लांटच्या शेजारीच विरल कंपनीचा प्लांट असल्याने कामगारांनी आग विझाण्यास सुरुवात केली. दोन तासांनंतरही आग आटोक्यात आणता आली नव्हती.
कंपनीत सुमारे 17 कामगार होते. आग लागताच अनेकजणांनी कंपनी बाहेर पळ काढला, मात्र प्लांटमध्ये काम करणारे विक्रम डेरे, निमाई मुरमक, मयूर निंबाळकर, राहुल गिरासे, स्वप्निल आंब्रे हे कामगार जखमी झाले आहेत. या कामगारांना महाड उत्पादक संघटनेच्या हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल केले आहे. यातील विक्रम डेरे हा गंभीररित्या जखमी झालेल्या असल्याने त्याला मुंबई येथे अधिक उपचार करता स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती कंपनी प्रशासनाने दिली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!