पनवेल दि.२८: पनवेलमधील शेकापचे डॅशिंग नेते एस. के. नाईक यांनी त्यांच्या हजारो समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. एस. के. नाईक यांनी जिल्हा परिषद सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून काम केले असून शहरातील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटना तसेच इतर संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकाऱ्यांनी केलेल्या या प्रवेशामुळे शेकापला मोठा हादरा बसला आहे.
शहरातील मार्केट यार्ड येथे झालेल्या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या हस्ते त्यांचे भारतीय जनता पार्टीत स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास माजी उपमहापौर चारुशीला घरत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, शहर सरचिटणीस अमित ओझे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, शहर कोषाध्यक्ष ज्योती देशमाने, शहर उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे, प्रमोद भिंगारकर, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान पक्षप्रवेश करण्यापूर्वी कार्यक्रमस्थळी जाताना पाचशेहून अधिक कार्यकर्त्यांचा ताफा मार्गस्थ झाला होता. भाजपचा झेंडा आणि घोषणांनी यावेळी आसमंतात दणाणून गेला होता. यावेळी शेकाप नेते एस. के. नाईक यांच्यासोबत दिलीप अन्नभुले, प्रल्हाद नाईक, रमेश चव्हाण, विजय मेहेर, अनंत कोळी, नारायण आंबोळकर, गुरुनाथ पाटील, सुनिल घाडगे, शंकर प्रजापती, शिवाची गाडे, रमेशकुमार गुप्ता, विजय मराठे, महादेव खराटे, महान नाईक, शिवप्पा कंकणवाडी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, हजारो समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश केला. त्यांचे पक्षात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!