रायगड दि.06: राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.30 सप्टेंबर 2025 अन्वये राज्यातील 247 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम-2025 जाहिर करण्यात आला आहे.
प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करणे, दि.8 ऑक्टोबर 2025. प्रारुप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दि.8 ऑक्टोबर ते दि.13 ऑक्टोबर 2025. अंतिम प्रभाग निहाय मतदार यादी अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करणे दि.28 ऑक्टोबर 2025. मतदार केंद्राची यादी प्रसिध्द करणे, आशा मतदार केंद्र निहायमतदार याद्या प्रसिध्द करणे दि.7 नोव्हेंबर 2025.
रायगड जिल्ह्यातील खोपोली, कर्जत, अलिबाग, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन, उरण या नगरपरिषदांच्या प्रारुप मतदार यादीवरील प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचना स्विकारणेकामी संबंधित नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याप्रमाणे पुढीलप्रमाणे आरक्षण सोडतीचे ठिकाण, वेळ तसेच आरक्षण व सोडतीवरील हरकती स्विकारण्याचे ठिकाण वेळ निश्चित करण्यात येत आहे.
नगरपरिषदेचे नाव: खोपोली, प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करणे तसेच प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, खोपोली नगरपरिषद, प्रारुप यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.8 ऑक्टोबर ते दि.13 ऑक्टोबर 2025, सकाळी 10.00 ते सांयकाळी 6.00, प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- खोपोली नगरपरिषद कार्यालय, खोपोली, ता.खालापूर, जि.रायगड,
नगरपरिषदेचे नाव: अलिबाग, प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करणे तसेच प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम-मुख्याधिकारी, अलिबाग नगरपरिषद, प्रारुप यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.8 ऑक्टोबर ते दि.13 ऑक्टोबर 2025, सकाळी 10.00 ते सांयकाळी 6.00,, प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- अलिबाग नगरपरिषद कार्यालय, ता.अलिबाग, जि.रायगड,
नगरपरिषदेचे नाव: महाड, प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करणे तसेच प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम – मुख्याधिकारी, महाड नगरपरिषद, प्रारुप यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.8 ऑक्टोबर ते दि.13 ऑक्टोबर 2025, सकाळी 10.00 ते सांयकाळी 6.00, प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण – महाड नगरपरिषद कार्यालय, ता.महाड, जि.रायगड.
नगरपरिषदेचे नाव: माथेरान, प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करणे तसेच प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, माथेरान नगरपरिषद, प्रारुप यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.8 ऑक्टोबर ते दि.13 ऑक्टोबर 2025, सकाळी 10.00 ते सांयकाळी 6.00, प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण-माथेराम नगर परिषद कार्यालय, ता.कर्जत, जि.रायगड.
नगरपरिषदेचे नाव: मुरूड जंजिरा, प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करणे तसेच प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, मुरूड जंजिरा नगरपरिषद, प्रारुप यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.8 ऑक्टोबर ते दि.13 ऑक्टोबर 2025, सकाळी 10.00 ते सांयकाळी 6.00, प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण-मुरूड जंजिरा नगरपरिषद कार्यालय, ता.मुरूड, जि.रायगड,
नगरपरिषदेचे नाव: पेण, प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करणे तसेच प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम – मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद, प्रारुप यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.8 ऑक्टोबर ते दि.13 ऑक्टोबर 2025, सकाळी 10.00 ते सांयकाळी 6.00, प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- पेण नगरपरिषद कार्यालय, ता.पेण, जि.रायगड.
नगरपरिषदेचे नाव: रोहा, प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करणे तसेच प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, रोहा नगरपरिषद, प्रारुप यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.8 ऑक्टोबर ते दि.13 ऑक्टोबर 2025, सकाळी 10.00 ते सांयकाळी 6.00, प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- रोहा नगरपरिषद कार्यालय, ता.रोहा, जि.रायगड.
नगरपरिषदेचे नाव: श्रीवर्धन, प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करणे तसेच प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगरपरिषद, प्रारुप यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.8 ऑक्टोबर ते दि.13 ऑक्टोबर 2025, सकाळी 10.00 ते सांयकाळी 6.00, प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- श्रीवर्धन नगरपरिषद कार्यालय, ता.श्रीवर्धन, जि.रायगड,
नगरपरिषदेचे नाव: उरण, प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करणे तसेच प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद, प्रारुप यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.8 ऑक्टोबर ते दि.13 ऑक्टोबर 2025, सकाळी 10.00 ते सांयकाळी 6.00, प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- उरण नगरपरिषद कार्यालय, ता.उरण, जि.रायगड.
नगरपरिषदेचे नाव: कर्जत, प्रारुप व अंतिम मतदार यादी तयार करणे तसेच प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, कर्जत नगरपरिषद, प्रारुप यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचा दिनांक व वेळ- बुधवार, दि.8 ऑक्टोबर ते दि.13 ऑक्टोबर 2025, सकाळी 10.00 ते सांयकाळी 6.00,, प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण-कर्जत नगरपरिषद कार्यालय, ता.कर्जत, जि.रायगड,
तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे.
![]()
