पनवेल दि.१९: महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व युवाशक्तीचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘अभंग रिपोस्ट’ या कला आणि सामाजिक दृष्ट्या महत्वपूर्ण अशा कार्यक्रमाचा हजारो पनवेलकरांनी मोठ्या प्रमाणात आनंद घेतला. पनवेल शहरातील गुजराती शाळेच्या मैदानावर हा कार्यक्रम भक्तिभावाचा संदेश देऊन गेला. यावेळी सर्वजण विठुरायाच्या गजरात तल्लीन झाले होते. यामध्ये लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी भक्तिभावाचा अनुभव घेतला. विशेषतः तरुणाईचा मोठा प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची उपस्थिती लाभली.
वारकरी सांप्रदायातील अभंग, भजनांना टाळ मृदूंगासोबतच पाश्चात्य वाद्यांची जोड देण्याचे काम अभंग रिपोस्ट बँन्ड करत आहे. या बँडने आतापर्यंत साडेसहाशे लाईव्ह परफॉमन्स सादर केले आहेत. या बँडला नुकताच झी २४ तास वृत्तवाहिनीकडून राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र गौरव २०२५ या पुरस्काराने गौरविण्यात आले. अशा या कार्यक्रमाची उत्सुकता पनवेलकरांना लागली होती, ती या आयोजनाच्या निमिताने पूर्ण झाली. या कार्यक्रमातून भक्तिभाव, संगीत व सांस्कृतिकतेचा संगम अनुभवायला मिळाला. पनवेलकरांच्या मनोरंजनाबरोबरच अध्यात्मिक समाधानासाठीही हा उपक्रम महत्त्वपूर्ण कार्यक्रम मनावर कायमचा ठसा उमटवणारा ठरला. या कार्यक्रमाचे आयोजन पनवेल शहर भाजपच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवाच्या अनुषंगाने स्टॉलला भेट दिली.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी नगरसेवक जयंत पगडे, अनिल भगत, गणेश कडू, एकनाथ गायकवाड, राजू सोनी, अजय बहिरा, गणेश पाटील, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, ब्रिजेश पटेल, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर, डॉ. सुरेखा मोहोकर, ऍड. वृषाली वाघमारे, रुचिता लोंढे, अमित ओझे, स्वाती कोळी, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, केदार भगत, रुपेश नागवेकर, प्रशांत मोरबाळे, संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.