रायगड दि. 20:- राष्ट्रीय महामार्ग क्र. 965, डीडी राजेवाडी ते वरंध (रायगड जिल्हा हद्द) मधील रस्ता हा रस्ता अधिसूचनेच्या दिनांकापासून ते दि.30 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीकरिता तसेच पावसाळ्यामध्ये आय.एम.डी.च्या अतिवृष्टीचा इशारा (High Alert) कालावधीत सदर रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीसाठी पूर्णत: बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
सदर कालावधीकरीता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करण्याबाबत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांनी केलेल्या विनंतीनुसार तसेच पावसाळ्यामध्ये आय.एम.डी.च्या अतिवृष्टीचा इशारा (High Alert) कालावधीत सदर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीसाठी बंद करण्याबबात जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे.
त्यानुसार नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-महाड-माणगांव-निजामपूर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे असा मार्ग वापरावा तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळूण-पाटण-कराड-कोल्हापूर असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.

🛑Konkan Railway ‘Coffee Table Book’🔹कोकण रेल्वेच्या अभियांत्रिकी चमत्कारांचे चित्ररूपी दर्शन

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!