पनवेल दि.२१: जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संकुल, नेहूली येथील प्रशस्त बॅडमिंटन हॉल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, राहुल कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, मेरा युवा भारतचे अमित फुंडे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी श्रीम. तपस्वी गोंधळी, क्रीडा अधिकारी सुचिता ठमाळे, आकाश डोंगरे, श्री अंबिका योग कुटीरचे संस्थापक विरेंद्र पवार या संस्थेचे प्रशिक्षक तसेच स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्थेचे स्वयंसेवक, प्रशिक्षणार्थी, सरकारी अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्यावतीने वडाळे तलावाजवळ भव्य स्वरूपात ‘योग दिवस’ साजरा करण्यात आला. पंतजली योग समितीचे, भारतीय नौसेनेचे निवृत्त लेफ्टनंट पतंजली योग समितीचे मुख्य प्रशिक्षक राम पलट यादव यांनी यावेळी उपस्थितांना योगासने व प्राणायम, ध्यान याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते, उपायुक्त मंगला माळवे, नगर रचनाकार राजेश कर्डिले, घनकचरा व स्वच्छता विभागप्रुख अनिल कोकरे , जिल्हा प्रभारी पतंजलि किसान सेवा समिति, पनवेल विभाग सर्वश्री रविंद्र मोरे, संजय कुमार सिंह , विविध सामाजिक जिल्हा प्रभारी पतंजलि पतंजलि युवा भारत, पनवेल विभाग विकास सूर्यभान देशमुख, पण्डित रामकेश शर्मा ,प्रमिला शशि कुमार शेट्टी, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने पनवेलजवळील प्रबळगड माची या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळी आयोजित करण्यात आलेल्या “योग विथ आमदार प्रशांत ठाकूर” या विशेष उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, प्रांताधिकारी पवन चांडक, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह  शेकडो युवक, महिला, स्थानिक नागरिक, तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. 

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!