उरण दि:17 (विठ्ठल ममताबादे) वटवृक्षांची नवी मुंबईचा संकल्प हाती घेतलेल्या वटवृक्ष सामाजिक संस्था यापुढे जास्तीत जास्त वटवृक्ष लागवडीबरोबर अनेक वृक्षप्रेमींना मोफत रोप व बीज वाटप अभियान राबवणार असल्याने ह्या वडबँक नर्सरीची शेलघर गावालगतच उलवे सेक्टर १६ येथील सिडकोच्या राखिव भुखंडावर उभारली गेली आहे. नागरिकांनी आपल्याकडील अधिक असलेले रोपे किंवा फळांच्या बीया ह्या वडबँक नर्सरीत ठेवुन रोपवाटिकेत उपलब्ध असलेली रोपे दिलेल्या काळावधीत स्विकारावी अशी संकल्पना आहे.
उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या अनोख्या रोपवाटिकेचा म्हणजेच वडबँक नर्सरीचे कामगार नेते महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी महेंद्र घरत यांनी वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या निसर्गसंवर्धनाच्या सेवाभावी कार्याला हातभार लावण्यासाठी संस्थेला ५१ हजार रुपयांची देणगी जाहिर केली.
तसेच राजीप सदस्य रविंद्र पाटील यांनीही किरण मढवी आणि संस्थेचे विशेष कौतुक केले. यावेळी राजीपचे माजी सदस्य वैजनाथ ठाकुर, डॉ. दिपाली गोडघाटे, रोहित भगत, वनविभागाचे डि. डि. पाटील, रमेश फोफेरकर, काशिनाथ खारपाटील, सर्पमित्र विवेक केणी, पक्षीमित्र आनंद मढवी, प्रगतशील शेतकरी प्रशांत पवार, सज्जन पवार, सुनील ठाकूर, ईतर वृक्षप्रेमी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माझी वसुंधरा अभियानाची शपथ घेवुन कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी आदर्श शिक्षक मढवी गुरूजींनी सर्वांचे आभार मानुन संस्थेला शुभेच्छा दिल्या.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!