पनवेल दि.१७ : पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागामार्फत आता कोवॅक्सीन आणि कोविशील्ड या दोन्ही प्रकारच्या लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या दोन्ही लसी सुरक्षित आहेत. आज पासून सर्व खाजगी रूग्णालयांत तसेच टाटा, उपजिल्हा रूग्णालय पनवेल येथे पहिल्या डोसच्या लाभार्थ्यांस कोव्हॅक्सीन लस दिली जाणार आहे. यापूर्वी कोविशील्ड चा पहिला डोस घेतलेल्या लार्भ्यार्थ्यांस 28 दिवसांनंतरचा कोविशील्डचा दुसरा डोस दिला जाणार आहे.
कोरोना लसीचा दुसरा डोस 28 दिवसांनंतर घेणे आवश्यक आहे. यामुळे पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवस पुर्ण झाल्यानंतर शासनाच्या एस.एम.एस वा फोनची वाट न पहाता नजिकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावयाची आहे. अशी माहिती महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली आहे.
एकुण लसीकरण – 28,480
पहिला डोस – 24,925
दुसरा डोस- 3,533
एकुण मिळालेल्या लस
कोवॅक्सीन – 3,000
कोविशील्ड – 28,000
आरोग्य कर्मचारी
पहिला डोस – 7,960
दुसरा डोस – 3,095
फ्रंटलाईन वर्कर
पहिला डोस – 4341
दुसरा डोस – 438
जेष्ठ नागरिक
पहिला डोस- 11,375
कोमॉर्बिडीटी- 1249