अलिबाग,दि.18: कोविड-19 विषाणूच्या प्रादूर्भावामुळे उद्भवलेली परस्थिती विचारात घेता, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
प्रतिबंधित (Containment Zone) क्षेत्राबाहेरील सिनेमा गृह, थिएटर, मल्टीप्लेक्स, नाट्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट ही 50 टक्के इतक्या बसण्याच्या (Seating Capacity) क्षमतेच्या मर्यादेत खालील प्रतिबंधाचे पालन करण्याच्या अधिनतेने सुरु राहतील.

अ) सिनेमागृह/थिएटर/ मल्टीप्लेक्स / नाटयगृहमध्ये खाण्यायोग्य पदार्थ नेण्यास मनाई असेल,ब) या ठिकाणी फेस कव्हर (Face Cover)/मुखवटे (Masks) परिधान केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही,क) सदर ठिकाणी ताप (Fever) असलेला व्यक्ती प्रवेश करणार नाही याची खात्री करण्याकरीता Thermal Scanning व्यवस्था करणे आवश्यक राहील, ड) या ठिकाणी Sanitizer, Handwash सोयीस्कर जागी ठेवणे आवश्यक राहील, इ) संबधित आस्थापनांनी प्रवेश करणाऱ्या व्यक्तीद्वारे मास्क परिधान करण्यात आलेला आहे, तसेच त्यांच्याद्वारे आवश्यक सामाजिक अंतर राखले जात आहे याची पडताळणी करण्याकरिता आवश्यक प्रमाणात कर्मचारी वृंद नियुक्त करावा.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना या कोविड-19 विषाणूची साथ असेपर्यत बंद करण्यात येतील तसेच या आस्थापना आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली दंडात्मक कारवाई करण्यास पात्र ठरतील.

सर्व दुकाने व शॉपींग मॉल यासारख्या आस्थापनांनी खालील प्रतिबंधाचे पालन करणे आवश्यक राहील. अ) या ठिकाणी फेस कव्हर (Face Cover)/ मुखवटे (Masks) परिधान केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही,ब) या ठिकाणी ताप (Fever) असलेला व्यक्ती प्रवेश करणार नाही, याची खात्री करण्याकरिता Scanning व्यवस्था करणे आवश्यक राहील, क) या ठिकाणी Sanitizer, Handwash सोयीस्कर जागी ठेवणे आवश्यक राहील, ड) संबधित आस्थापनांनी प्रवेश करणान्या व्यक्तीद्वारे मास्क परिधान करण्यात आलेला आहे, तसेच त्यांच्याद्वारे आवश्यक सामाजिक अंतर राखले जात आहे, याची पडताळणी करण्याकरिता प्रमाणात कर्मचारीवृंद नियुक्त करावा, इ) मॉल व्यवस्थापनाने त्यामधील सिनेमा गृह. थिएटर, मल्टीप्लेक्स, रेस्टॉरंट व इतर अन्य आस्थापनांद्वारे यापूर्वी लागू केलेल्या, वर नमूद केलेल्या तसेच सद्य:स्थितीत लागू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनाची अंमलबजावणी केली जात आहे, याची खात्री करावी.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना या कोविड-19 विषाणूची साथ असेपर्यंत बंद करण्यात येतील तसेच सदर आस्थापना कायद्याखाली दंडात्मक कारवाई करण्यास पात्र ठरतील.

सर्व प्रकारचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, करमणूक, धार्मिक बाबी इ. निगडीत कार्यक्रम, समारंभ, सण, उत्सव, ऊरुस, जत्रा, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने इ. यांचे आयोजन करण्यास मनाई राहील व याचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली जागेचे / भालमत्तेचे मालक हे दंडात्मक कारवाईस पात्र राहतील. तसेच सदर मालमत्ता ह्या कोविड-19 विषाणूची साथ असेपर्यंत बंद करण्यात येतील.

लग्नाच्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त व्यक्तींची अनुज्ञेय राहणार नाही, अ) या ठिकाणी फेस कव्हर (Face Cover)/ मुखवटे (Masks) परिधान केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, ब) या ठिकाणी ताप (Fever) असलेला व्यक्ती प्रवेश करणार नाही याची खात्री करण्याकरीता Thermal Scanning व्यवस्था करणे आवश्यक राहील, क) या ठिकाणी Sanitizer, Handwash सोयीस्कर जागी ठेवणे आवश्यक राहील, ड) संबंधित आयोजकांनी प्रवेश करणाऱ्या व्यक्तीद्वारे मास्क परिधान करण्यात आलेला आहे, तसेच त्यांच्याद्वारे आवश्यक सामाजिक अंतर राखले जात आहे याची पडताळणी करण्याकरीत आवश्यक प्रमाणात कर्मचारी वृंद नियुक्त करावा.

अनावश्यक गर्दी न होऊ देता, (Non Covid व्यक्तींसाठी) आवश्यक शारिरीक अंतर (Physical distance) ठेवून कमाल 20 व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पाडता येतील. या बाबीची अंमलबाजणीची जबाबदारी स्थानिक प्राधिकरण/प्रशासन यांची राहील.

गृह अलगीकरण (Home lsolation) खालील बाबीच्या अधिनतेने अनुज्ञेय राहील. अ) गृह अलगीकरणाची (Home Isolation) माहिती ज्या वैद्यकीय व्यवसायिकाच्या देखरेखीखाली ते करण्यात येत आहे, याच्या तपशिलासह स्थानिक प्राधिकरणास देणे बंधनकारक राहील, ब) गृह अलगीकरणाखाली (Home Isolation) ठेवण्यात आलेल्या ठिकाणी कोविड-19 बाधित रुग्ण असल्यासंदर्भात फलक दर्शनी भागात 14 दिवसाकरीता लावणे बंधनकारक असेल, क) गृह अलगीकरणाचा (Home Isolation) शिक्का कोविड-19 बाधित रुग्णांवर मारणे आवश्यक राहील, ड) कोविड-19 बाधित रुग्णांच्या नातेवाईकांनी सुध्दा शक्यतोवर बाहेर जाणे टाळावे व फेस कव्हर (Face Cover)/ मुखवटे (Masks) परिधान करणे बंधनकारक राहील, इ) गृह अलगीकरणाबाबत (Home Isolation) उपरोक्त बाबींचे उल्लंघन केल्यास संबधितास तात्काळ प्रभावाने स्थानिक प्राधिकरणाने स्थापित केलेल्या कोव्हीड केंद्रामध्ये (Covid Care Center) स्थलांतरीत करण्यात येईल.

सर्व धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापकांनी /विश्वस्तांनी सदर धार्मिक स्थळांच्या ठिकाणच्या जागेची उपलब्धता विचारात घेऊन गर्दी होणार नाही व आवश्यक सामाजिक अंतर (Social Distancing) राखले जाईल या दृष्टीने एका वेळी जास्तीत जास्त किती व्यक्तींना प्रवेश दिला जाऊ शकेल याची निश्चिती करुन, त्याप्रमाणे प्रवेश अनुज्ञेय करावा. तसेच शक्यतो दर्शनासाठी ऑनलाइन आरक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करावी. सदर ठिकाणी खालील बाबींचे पालन करण्याच्या अधिनतेने प्रवेश अनुज्ञेय राहील.

अ) या ठिकाणी फेस कव्हर (Face Cover)/मुखवटे (Masks) परिधान केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, ब) या ठिकाणी ताप (Fever) असल्नेना व्यक्ती प्रवेश करणार नाही याची खात्री करण्याकरिता ThermalScanning व्यवस्था करणे आवश्यक राहील, क) या ठिकाणी Sanitizer, Handwash सोयीस्कर जागी ठेवणे आवश्यक राहील. ड) संबधित आस्थापनांनी प्रवेश करणाऱ्या व्यक्तीद्वारे मास्क परिधान करण्यात आलेला आहे, तसेच त्यांच्याद्वारे आवश्यक सामाजिक अंतर राखले जात आहे याची पडताळणी करण्याकरिता आवश्यक प्रमाणात कर्मचारीवृंद नियुक्त करावा.

हे आदेश दि. 31 मार्च 2021 पर्यंत लागू राहतील. या आदेशाची अंमलजावणी सर्व आस्थापनांमार्फत/नागरिकांमार्फत काटेकोरपणे केली जाईल, यादृष्टीने आवश्यक नियोजन जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी करावे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188,269,270, 271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतूदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांन सूचित केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!