पनवेल दि.७: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोविड 19 लसीकरणाच्या तिसरा टप्पा सुरू आहे. मात्र लसींचा तुटवडा असल्याकारणाने काही दिवस लसीकरण कार्यक्रम बंद करण्यात आला आहे. सध्या कोव्हॅक्सीन आणि कोविशिल्ड अशा दोन प्रकारच्या लस नागरिकांना देण्यात येत आहे. कोविशिल्ड लसींचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण सुविधा काही दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. कोव्हॅक्सीन दुसरा डोस काही प्रमाणात उपलब्ध आहे परंतू याचा पहिला डोस 16 मार्चपासून देण्यास सुरूवात केली आहे, याचा दुसरा डोस 16 एप्रिलपासून देण्यास सुरूवात होईल.
पनवेल महानगरनगरपालिका क्षेत्रात सद्या २१ लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. यामध्ये नऊ शासकीय आणि बारा खाजगी लसीकरण केंद्रामध्ये हे लसीकरण चालू आहे. आत्तापयत एकुण 632 लसीकरण  सत्रे घेण्यात आली आहेत. यामध्ये आत्ता पयर्त  एकुण लसीकरण   63879 लसीकरण करण्यात आले आहे. रोज सरासरी 2500 लसीकरण होत असून लसींचा साठा उपलब्ध झाल्यावर पुन्हा एकदा लसीकरणाचे काम सुरळीतपणे चालू करण्यात येईल. अशी माहिती महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाने दिलेली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!